पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, पुण्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात दाखल होऊन त्यांनी गोंधळ घातला आहे, दरम्यान यावेळी पुणे पोलिसांचे कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,पण प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत कार्यक्रम स्थळी प्रवेश घेऊन आत दाखल झाले, व अजित पवार यांचे भाषण सुरू होताच या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला,व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले, दरम्यान पोलिसांनी 👮 या सर्व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले आहेत.तसेच राज्य सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार आहे,असे म्हटले आहे, दरम्यान बाहेर देखील या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला, तोंडी आदेश नको, सरकारने तसा शासकीय अध्यादेश जारी करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्ते करत होते.दरम्यान या आंदोलनात प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या या मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या.