पुणे १७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवार दिनांक १७ जून पासून कात्रज डेअरीकडून दूधाचा दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी याबाबत माहिती दिली आहे, दरम्यान दिनांक १६ जूनच्या मध्यरात्रीपासून १लिटर दूधासाठी ५५ रुपयांच्या ऐवजी ५७ रुपये मोजावे लागतील, दरम्यान याआधी मे महिन्यात टोण्ड दूधाच्या दर वाढविण्यात आले होते, आता पुन्हा दरवाढ केल्याने नागरिकांना आजपासून अतिरिक्त २ रुपये मोजावे लागतील,