Home Breaking News मुंबईत व उपनगरांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस,लोकल सेवा विस्कळित

मुंबईत व उपनगरांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस,लोकल सेवा विस्कळित

123
0

पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे,पावसाची संततधार सुरू आहे, अजूनही पाऊस सुरू आहे,दादर, व लोअर,परेल,सायन या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, या पावसामुळे सकल भागात पाणी साचले आहे, पावसामुळे वाहतूकीवर देखील परिणाम झाला आहे,तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे,

दरम्यान रात्रीपासूनच सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे,आता मुंबई मध्ये दादर व माहिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, जोरदार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे, तसेच लोकलसेवा देखील प्रभावित झाली आहे,अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे,मध्य रेल्वे २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहे,तर पश्चिम रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे, त्यामुळे सकाळी कामाधंद्यावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे,

Previous articleदेहूमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुजा,तुकाबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Next articleशिवसेनेचे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here