पुणे २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर व जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने तसेच धरणक्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने, खडकवासला धरणातून तब्बल १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, तसेच नदीकाठच्या गावांना व लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तसेच मुळा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.तर पुण्यातील भिडे पुलाच्या कठाड्याला पाणी लागले आहे, तसेच आज शुक्रवारी देखील पुणे शहर व जिल्ह्यात तसेच घाटमाथ्यावर हाकला ते मध्यस्वरुपाचा पाऊसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.तरी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील आवहान करण्यात आले आहे,