Home Breaking News चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या वारकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या वारकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

85
0

पुणे २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पंढरपूर येथून खळबळजनक अपडेट आली असून, पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी गेलेला वारकरी शुभम पावले (वय २७ रा.बेळगाव ) याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे, दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शुभम हा पंढरपूरला बेळगाव येथून विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी आला होता. दरम्यान आज दर्शन घेण्यापूर्वी तो चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी तो इतरांबरोबर गेला होता,मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला.बचाव पथकाने त्याचा शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. दरम्यान वारकरी याचा मृत्यू झाल्याने अनेकजण हळहळ व्यक्त करत होते.

Previous articleमहाराष्ट्रात मुसळधार पाऊस पर्यटनस्थळांवर लागू केले निर्बंध, सेल्फी आणि चित्रीकरण करण्यास बंदी
Next articleवारीचा फोटो काढताना मुळा नदीत पडलेल्या मुलाची सुखरूप सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here