पुणे २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातून आली आहे, पुणे जिल्ह्या मधील लोणावळा येथील कुसगाव येथे बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे, दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बापा विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत,बाप -मुली च्या नात्याला काळिमा फासला आहे, त्यामुळे लोणावळ्यात एकच खळबळ उडाली आहे,
दरम्यान या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लोणावळा कुसगावमध्ये बापाने अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना बापाने तिच्यावर बलात्कार केला आहे, दरम्यान या घटनेची मुलीच्या आईने लोणावळा पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 👮 बापा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, या गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत,