पुणे २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी सकाळीच ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे, त्यामुळे बारामतीत कडेकोट असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, दरम्यान या साखर कारखाना निवडणूक मध्ये एकूण ४ पॅनेल आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्री निलकंठेश्र्वर आणि चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल मध्ये मुख्य चुरस होणार आहे, दरम्यान या निवडणुकीकी दरम्यान बारामती येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही रात्री 🌃 उशीरा सुरू ठेउन मतदार यादी नुसार 💸 पैशाचे वाटप करण्यात आला असा आरोप चंद्रराव तावरे गटाच्या वतीने करण्यात आला होता, दरम्यान आजच्या मतमोजणीत कोणाचे पॅनेल बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,तर अजित पवार यांनी चेअरमन पदासाठी इच्छुक असल्याचे देखील बोलले जात आहे,