पुणे २६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे, आपल्या मराठीसाठी व महाराष्ट्रासाठी तसेच मराठी माणसासाठी येत्या ६ जुलै रोजी मोर्चाची घोषणा केली होती,त्यात आता त्यांनी थोडा बदल केला आहे,सदरचा मोर्चा रविवारी ६ जुलै ऐवजी शनिवारी ५ जुलैला होणार आहे, सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे,असे राज ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले,तसेच ठिकाण गिरगाव चौपाटी मुंबई असेच राहणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी,असे त्यांनी सांगितले आहे, दरम्यान या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल,तर फक्त मराठीचा अजेंडा असेल!
दरम्यान येत्या ५ जुलैला गिरगाव चौपाटी मुंबई येथे मनसे हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहे, यासाठी तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याची माहिती मिळत आहे, अशातच आता या मोर्चाला मनसेकडून शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे,अशी माहिती समोर येत आहे, हिंदी भाषा सक्तीची विरोधात भूमिका मांडण्यासाठी आपणही या मोर्चाला यावे,असे निमंत्रण मनसेने संजय राऊत यांना फोनवरून दिले आहे, त्यामुळे या मोर्चाला संजय राऊत येणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल,