पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, महायुती सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा लावून धरल्यानंतर हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा मुंबईत निघेल असे X हॅंडलवर उध्दव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले की, तसेच त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे, त्यामुळे शनिवारी दिनांक ५ जुलै रोजी मनसेच्या हिंदी सक्तीविरोधात मोर्चात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे, दरम्यान या आधी मनसे आणि सेनेचा एकच मोर्चा असणार आहे,असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले होते,
दरम्यान हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आम्हाला लढावे लागेल आणि त्याचे नेतृत्व ठाकरे यांनाच करावे लागेल, तसेच राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू मनाने एकत्र आले आहेत, राज्याच्या मनात आहे तेच करेन,असे उध्दव ठाकरे हे वारंवार सांगत आहेत,मला राज ठाकरे यांचा फोन आला होता, दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही,असे ते मला म्हणाले, तसेच ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने सदरचा मोर्चा हा शनिवार ५ जुलै रोजी निघणार आहे, तसेच वेळेबाबत बदल करावा लागेल, त्याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहे,