Home Breaking News ‘काटा लगा ‘ गर्ल प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराने निधन,४२ वर्षी...

‘काटा लगा ‘ गर्ल प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराने निधन,४२ वर्षी घेतला अखेरचा श्वास चित्रपट सृष्टीवर शोककळा

228
0

पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पहाटे एक खळबळजनक अपडेट ही चित्रपट सृष्टीतून मुंबई वरुन आली आहे, प्रसिद्ध अभिनेत्री व माॅडेल ‘काटा लगा’ गर्ल व बिग बॉस १३ मध्ये सहभागी झालेल्या शेफाली जरीवाला यांचे वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेफाली जरीवाला हिला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्येत बिघडली म्हणून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते,मात्र रुग्णालयातील डॉक्टर यांनी तिला दाखल करून घेण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले आहे,

दरम्यान शेफाली जरीवाला हिचा पती पराग व इतर तीन जणांनी तिला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले आहे, दरम्यान ही चित्रपटसृष्टीत अंत्यंत दखादायक अपडेट आहे, पुढील प्रक्रियासाठी तिचे पार्थिव कपूर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, दरम्यान शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे, दरम्यान शेफाली जरीवाला ही सन २००२ मध्ये ‘काटालगा’ या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली होती, त्यानंतर ‘मुझसे शादी करेंगी ‘ नच बलिए आणि बिग बॉस ‘१३’ या सारख्या कार्यक्रमात झळकली होती, तसेच ती सोशल मीडियावर शेफाली जरीवाला कायम सक्रिय होती, तसेच तिने महिलांच्या हक्कांसाठी देखील आवाज उठवला होता, दरम्यान शेफाली जरीवालाच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीतील एक तेजस्वी व बिनधास्त आवाज हरपला आहे,

Previous articleपुरी जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी ५८१ पेक्षा जास्त चेंगराचेंगरी जखमी,८ जणांची प्रकृती चिंताजनक
Next article‘हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण दिले जाणार ‘ दादा भुसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here