पुणे २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पावसाची आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. व धुमाकूळ घातला आहे,आज देखील हवामान विभागाच्या वतीने राज्यात अलर्ट घोषित करण्यात आला आहे,त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस कोसळत आहे, या पावसामुळे दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे, एवढेच नाही तर ब्रम्हापुरी -वडसा मुख्य महामार्गावरील नाल्यावरील पूल देखील वाहून गेला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, येथील नागरिकांना बाहेर पडणं मुश्किल झाले आहे,
दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे, सध्या कोल्हापूर, सातारा, सांगलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे, तसेच हवामान विभागाच्या वतीने आज देखील अनेक जिल्ह्यांना अलर्ट घोषित केला आहे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथ्यावर तसेच पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे या भागात ऑंरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे तरी नागरिकांनी यांची दक्षता घ्यावी,