Home क्राईम अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी,...

    अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी, कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

    107
    0

    पुणे ३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, अहिल्या नगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे,सदरची धमकी आमदार यांचे स्वीय सहायक यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला आहे, त्यानंतर राजकीय वर्तुळात व अहिल्यानगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार संग्राम जगताप हे मुंबईत आहेत, दरम्यान सदर धमकी प्रकरणात त्यांचे स्वीय सहायक यांनी अहिल्यानगर येथील कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे, पोलिसांनी 👮 या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे,

    दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी त्यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज द्वारे देण्यात आली आहे, दरम्यान या धमकी प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान आलेल्या मेसेज मध्ये ” संग्राम को दो दिन मे अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, दरम्यान हिंदुत्ववादी भूमिका आणि वक्तव्यामुळे आमदार संग्राम जगताप हे चांगलेच चर्चेत आले आहे,याच पार्श्वभूमीवर त्यांना थेट जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात व नागरिकां मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अमिना शेख या करीत आहेत, दरम्यान आमदार संग्राम जगताप हे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे ते अधिवेशनात आहे,

    Previous articleमुसळधार पावसाने पुणेकरांची उडवली दैना, सकाळपासूनच पावसाला सुरुवात
    Next articleकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here