पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कालच रात्री पुणे शहरात दाखल झाले आहेत,आज त्यांच्या हस्ते शुक्रवारी ११ वाजता पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ व भाजप शहराध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत, दरम्यान सदरचा कार्यक्रम हा नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे होणार आहे,
दरम्यान आज शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा व रुपरेषा या प्रमाणे आहे, सकाळी ११ वाजता नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे बाजीराव पेशवेंच्या पुतळ्या चे अनावरण होईल,त्यानंतर गृहमंत्री शाह हे ११.३० वाजता संरक्षण अकादमीच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत,त्या नंतर दुपारी १२ वाजता जयराज स्पोटर्स अॅन्ड कन्वेंशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत, दुपारी २.१५ वाजता PHRC हेल्थ सिटीचे अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.