पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही शैक्षणिक क्षेत्रामधून आली आहे, दरम्यान महाराष्ट्रात इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवल्या जातील,यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा सक्तीचा समावेश असेल,असा निर्णय महायुती सरकारने घेतला होता, दरम्यान याला महाराष्ट्रात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसेच अनेक राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर महायुती सरकारने काढलेला जीआर मागे घेण्यात आला होता,त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे, आता राज्य सरकारच्या वतीने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नव्या शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे,यात आता हिंदी भाषा हद्दपार झाली आहे, तसेच यात कला,क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ वाढवण्यात आला आहे,