पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मराठी विजयी मेळावा संदर्भात अपडेट आली आहे, दरम्यान ठाकरे बंधूचा ‘विजय मेळावा ‘ उद्या शनिवारी दिनांक ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे पार पडणार आहे, त्यामुळे पहिल्यांदाच शिवसेना उध्वव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे दोघे बंधू एकाच मंचावर दिसणार आहे, महाराष्ट्र माझा, मराठी एकजुटीचा विजय असो,असे अशाय लिहिलेले अनेक बॅनर ठाकरे बंधू साठी लावण्यात आले आहेत,तसा एक ट्रीजर देखील पाहण्यास मिळत आहे, दरम्यान विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर व शिवसेनेचे नेते परब यांनी वरळी डोम मधील मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे, दरम्यान शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी या मेळाव्यासाठी सर्व पक्षांना खुले निमंत्रण दिले आहे,तर या मेळाव्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे.तर मराठी भाषेचा अजेंडा असणार आहे,