पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज आषाढी एकादशी व आषाढी एकादशीला डोळ्यासमोर येते ते पंढरपूरच्या लाडक्या विठ्ठल -रुक्मिणीचे मनमोहक असं रुप संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने वारकरी हे मजल दरमजल करत पायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात,पण जसे ते पंढरपूरात दाखल होताच त्यांचा थकवा कमी होतो ,व ओढ लागते फक्त लाडक्या विठ्ठल व रुक्मिणीच्या दर्शनाची तसेच सजलेले लाडक्या विठ्ठल -रुक्मिणीचे रुप व सुंदर फुलांनी सजलेली अवघी पंढरपूर नगरी हे सर्व चित्र डोळ्यासमोर येते,
दरम्यान आज आषाढी एकादशी दिवशी वारकऱ्यांमुळे पंढरपूरनगरीचे रुपात मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे, दरम्यान महाराष्ट्रा मधील कानाकोपऱ्यात आलेल्या वारकऱ्यांमुळे जिथे नजर जाईल तिथे वारकरी असं चित्र आहे, अनेक वारकरी व भावीक मोठ्या संख्येने लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत,ही संख्या जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त आहे,तर पंढरपूरनगरी ही केवळ फुलांनी नाही तर लाखो वारकऱ्यांच्या भक्ती भावानेही सजली आहे, दरम्यान या वेळी कुणी फुगडी खेळून तर कुणी विठूरायाच्या नामघोषात तल्लीन झाले आहेत, दरम्यान आता पंढरपूरची वारी हायटेक वारी झाली आहे, सध्या सोशल मीडियावर देखील अनेक वारकऱ्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत,व वारकऱ्यांची भक्ती यातून दिसून येते, दरम्यान आज आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा,जय हरी विठ्ठल,