Home Breaking News मीरा -भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच -संदीप देशपांडे

मीरा -भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच -संदीप देशपांडे

185
0

पुणे ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, ठाणे -पालघरचे अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी 👮 आज पहाटेच साडेतीन वाजता अटक केली आहे, तसेच अन्य पदाधिकारी यांची देखील पोलिस धरपकड करत आहेत, दरम्यान आज सकाळी १० वाजता मनसे मीरा -भाईंदरमध्ये मोर्चा काढणार होते, म्हणून महायुती सरकार च्या दबावानंतर पोलिसांनी 👮 ही कारवाई केली आहे,असा गंभीर आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे, दरम्यान पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी मनसे मोर्चा काढणारच असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद मध्ये बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की,मीरा -भाईंदर मध्ये आज मनसे मोर्चा काढणार म्हणजे काढणार आम्ही पोलिसांच्या दडपशाहीला घाबरणार नाही, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्व करेल, तसेच या पोलिसांनी 👮 गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला कशी परवानगी दिली,हे सरकार व पोलिस किती मराठी माणसांना अटक करणार हे सांगा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करून राज्यात दंगली या सरकारला घडवायच्य आहेत, तसेच भाजपचे चिथावणी खोर नेत्यांना देखील दंगली घडवायच्या आहेत, व शांत असलेला महाराष्ट्र अशांत करावयाचा आहे.पण आम्ही तसे घडू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे,

Previous articleमीरा-भाईंदर मोर्चा अधिच मनसेच्या नेत्यांची पहाटे पासून धरपकड, अविनाश जाधव यांना पोलिसांनी केली अटक तरी मनसेचा मोर्चा निघणारच
Next articleमहाराष्ट्रात अमराठी व्यापा-यांचा मीरा-भाईंदर मधील मोर्चा सरकार पुरस्कृत होता आज मनसे नेत्यांची धरपकड वरुन सिद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here