पुणे ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली आहे, महायुती सरकार मधील शिवसेना आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिस आयुक्तावर गंभीर आरोप केले आहेत,मीरा-भाईंदर येथे मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी 👮 परवानगी न देता काल रात्रीपासून धरपकड करुन मराठा समाजाच्या माणसावर अन्याय केला आहे,मी स्वतः आता मीरा-भाईंदर येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी जात आहे, मला कोणाला आडवायचे त्यांनी आडवून दाखवावे असे आवाहनच त्यांनी पोलिसांना दिले आहे.व ते स्वतः आता मंत्रालयातून मीरा -भाईंदरकडे तातडीने निघाले आहेत,असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे, दरम्यान आता महायुती सरकारमध्येच या मोर्चा वरुन दोन गट पडलेले दिसत आहे, दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी 👮 जमावबंदी आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी मराठा समाजाच्या माणसांवर दादागिरी करत आहेत , तसेच मोर्चा तोडून काढून मराठा समाजाच्या माणसांवर अन्याय करत त्यांना बळजबरीने ताब्यात घेत आहेत. असा गंभीर आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे,