पुणे १० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आपण लहान वयात शाळेत जातो व आपल्याला गुरुजी शिकवतात तिथेच आपला शिक्षणाचा मार्ग सुरू होतो,म मराठीचा पासून गुरूजी शिकवतात तिथेच धडे गिरवायला शिकवतात, शाळेत असताना जबर मार खावा लागतो पण कशासाठी? विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावं. विद्यार्थ्यांना चांगलं वळण तसेच चांगल्या सवयी लागाव्यात म्हणूनच ना , त्या वेळी आपल्याला गुरुजींची छडी पडली नसती तर,ती शिस्त,ते वळण विद्यार्थ्यांना लागले असते का? खरंतर शिक्षकांमुळेच शाळा विद्येचे घर बनते, विद्यार्थ्यांना घडवणा-या सर्व शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,
आज गुरुवार आज गुरुपौर्णिमा हिंदू धर्मात या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पोर्णिमेच्या तिथीला साजरी केली जाते, या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात,कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता,गुरु व्यासांनी महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आणि १८ पुराणे यासारखे अद्भुत साहित्य रचले, म्हणूनच त्यांना पहिले गुरू मानले जाते, दर वर्षी त्यांच्या जन्मदिवशी गुरुची पुजा केली जाते व आशीर्वाद घेतले जातात,