पुणे ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक गुजरात मधील वडोदरा येथून आली आहे, गुजरातच्या वडोदरा येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे,४ जण अद्याप बेपत्ता आहेत,तर ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान सदरचा पूल हा ४५ वर्षांपूर्वी बांधलेल्या होता, आता या दुर्घटनेनंतर वडोदरा नगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे, दरम्यान या पूल दुर्घटनेला ४ अभियंत्यांना दोषी धरुन त्यांना तातडीने निलंबित केले आहे, दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या अभियंता मध्ये कार्यकारी,व सहाय्यक, आणि कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे,तर पूल दुर्घटनेनंतर या पूलाची चौकशी दरम्यान बांधकाम आणि देखभाल मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या आहेत,