पुणे ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती प्रगतशील महाराष्ट्राचे जीवंत चित्र समोर आले आहे, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी महायुती सरकारकडे निधी आहे,पण गाव खेड्यात विकासासाठी या सरकारकडे निधी नाही हे ज्वलंत उदाहरण आहे, दरम्यान शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूल नाही, एक तात्पुरता व धोकादायक अशा पूलावरुन चिमुकल्या विद्यार्थ्यांना धोका पत्करून शाळेत जावा लागत आहे,व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, दरम्यान महाराष्ट्रा मधील नंदुरबार मध्ये असलेल्या वारखेडी नदी वर पूल नसल्याने गावकऱ्यांनीच बांबू अन् दोरीच्या सहाय्याने हा पूल बांधला आहे, व याच्याच सहाय्याने विद्यार्थी रोज शिक्षणासाठी शाळेत जात आहेत,