पुणे १५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे,आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे, दरम्यान रायगड जिल्ह्यात पुढील काही तासांमध्ये मुसाळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, तसेच दक्षिण रायगड मधील म्हसळा तालुक्याला पावसाने जोरदार झोडपले आहे, तर येथील पूल देखील पाण्याखाली गेला आहे,आज सकाळपासून तुफान पाऊस कोसळत आहे,तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, येथे हवामान विभागाच्या वतीने ऑंरेज अलर्ट जारी केला आहे,
दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग, जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे,तर हवामान विभागाच्या वतीने या भागात येलो अलर्ट घोषित केला आहे, तसेच पुणे, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे,तर बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे,