पुणे १५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदातून आता मुक्त झाले आहेत, दरम्यान जयंत पाटील यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता,पण खासदार सुप्रिया सुळे यांनी हे नाकारले होते. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली व सदर बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे,
दरम्यान काल सोमवारी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज तातडीने मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची बैठक घेण्यात आली व सदर बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे,” मी प्रदेशाध्यक्ष पदावरुन बाजूला होत आहे,जे नवे प्रदेशाध्यक्ष असतील त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.ही शेवट नाही नव्या पर्वाची सुरुवात आहे,मी जातोय पण सोडत नाही”,असे पाटील म्हणाले, दरम्यान आज मंगळवारी मुंबईतील बैठकीत शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे,