Home Breaking News विधानभवनाबाहेर रात्रभर राडा आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केली अटक, आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली...

विधानभवनाबाहेर रात्रभर राडा आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केली अटक, आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली झोपले त्यांना पोलिसांनी चक्क फरफटत नेऊन बाजुला फेकलं

153
0

पुणे १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला रात्री गंभीर वळण मिळालं, दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला सदनाच्या आवारात मारहाण करण्यात आली होती, रात्री पोलिसांनी 👮 आव्हाड यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख यांना अटक केली,त्यानंतर पोलिस व आव्हाड यांच्यातील वाद शिगेला पोहोचला यावेळी रात्री १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार देखील आले होते, दरम्यान पोलिसांनी आव्हाड यांना पोलिसांच्या जीप समोरुन चक्क फरफटत ओढून बाजुला फेकून दिले, त्यांच्या कार्यकर्त्या ला घेऊन गेले,हा सर्व ड्रामा रात्रभर विधान भवनासमोर सुरू होता,

दरम्यान रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्ते हे पोलिसांच्या जीपच्या समोर झोपले,पण पोलिसांनी 👮 बळाचा वापर करून आमदार जितेंद्र आव्हाड यांना अक्षरशः जीप समोरुन बाहेर खेचून काढलं व बाजूला फेकून दिले.व त्यांचा कार्यकर्त्याला घेऊन गेले, यावेळी मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी 👮 सोडून दिले.व मारहाण ज्याला झाली त्यालाच अटक केली आहे, त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे चांगलेच संतप्त झाले व त्यांनी पोलिसांच्या गाडी समोर आव्हाड व कार्यकत्यांनी आंदोलन सुरू केले, पोलिसांनी बळाचा वापर करून आमदार व  कार्यकर्त्यांना अक्षरं बाहेर खेचून साइडला फेकण्यात आले,त्यानंतर आमदार व कार्यकर्ते हे पोलिस स्टेशन बाहेर रात्रभर आंदोलन सुरू केले होते, यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते, दरम्यान या वेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यां ला मारहाण करून त्यालाच अटक केली व पडळकर यांच्या ५ ते ६ कार्यकर्ते यांना सोडून दिले आहे, तसेच टकले हा मकोका मधील गुन्हेगार असून चव्हाण नावाचा पोलिस अधिकारी त्याला अक्षरशः तंबाखू चोळून देत होता असा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला आहे, तसेच विधानभवन घोडे नावाच्या सचीवांनी माझ्या कार्यकर्त्याला अटक करण्याचा घाट रात्री साडेबाराच्या सुमारास घातला आहे, पडळकरचे ५ जण पळून गेले चव्हाण नावाच्या पोलिस अधिकारी याला सस्पेंड करा असे आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच पडळकर यांनी आपल्याला मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला आहे,

Previous articleअकोल्यातील दोन गटात तुफान गोळीबार ८ जण जखमी
Next articleमुंबईत मोठी दुर्घटना घरात सिलिंडरचा मोठा स्फोट, स्फोटानंतर तीन मजली चाळ कोसळून १२ जण अडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here