Home क्राईम इंदापूरतील हाॅटेलमध्ये हत्ये प्रकरणी चार जणांच्या आवळल्या मुसक्या

    इंदापूरतील हाॅटेलमध्ये हत्ये प्रकरणी चार जणांच्या आवळल्या मुसक्या

    112
    0

    पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर येथील एका हाॅटेलमध्ये पुण्यातील युवकाचा पूर्ववैमनस्यातून रिव्हालवरमधून गोळ्या झाडून हत्या केली होती व तसेच कोयत्याच्या सहाय्याने वार करुन खून करण्यात आला होता.खून झालेल्या युवकांचे नाव अविनाश धनवे असे होते.या घटने नंतर इंदापूर मध्ये एकच खळबळ उडाली होती.दरम्यान या खूनाची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींच्या शोधाकरीता पथके तयार करुन त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.

    दरम्यान या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकूण चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत १) बाबुराव भेंडेकर २) मयूर पाटोळे ३) सतिश पांडे ४) विश्र्वंभर भत्ते अशी त्यांची नावे आहेत.या खूना प्रकरणी एकूण दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुणे गार्मीण पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

    Previous articleमंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
    Next articleमेव्हणी बरोबर नाचला म्हणून बायकोने चप्पलीने धुतला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here