Home क्राईम आर्थिक चणचणितून मुलिचा खून करुन वडीलांची आत्महत्या

  आर्थिक चणचणितून मुलिचा खून करुन वडीलांची आत्महत्या

  34
  0

  पिंपरी चिंचवड १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवड येथील थेरगाव येथे एक दुर्दैवी अशी घटना घडली असून घरात असलेल्या आर्थिक चणचणितून नैराश्यापोटी वडीलांनी पोटच्या मुलीचा खून करुन नंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केली आहे.

  दरम्यान याप्रकरणी वाकड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या वडीलांचे नाव भाऊसाहेब बेदरे (वय ४५ थेरगाव) असे आहे.तर मुलीचे नाव नंदिनी बेंदरे (वय ७ रा.थेरगाव ) असे आहे. दरम्यान आत्महत्या करणाऱ्या भाऊसाहेब यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून आपण आर्थिक चणचणितून आत्महत्या केली आहे.असे चिठ्ठीत मजकूर होता.त्यांची पत्नी ही माहेरी गेली होती.ती बाहेरुन परत आल्यानंतर तिला घरात मुलगी व पत्नी हे दोघेजण मृतावस्थेत दिसले. सदरच्या घटनेबाबत वाकड पोलिस स्टेशन मध्ये नोंद असून या प्रकरणी अधिक तपास हा वाकड पोलिस हे करीत आहेत.

  Previous articleउध्वव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्याला छोटा राजनचा फोन
  Next articleपूर्ववैमनस्यातून चाकण येथे सराईत गुन्हेगारांवर गोळीबार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here