पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील घाटकोपरमधील उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा सर्वत्र आहे.दरम्यान घाटकोपर पूर्वचे उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास रुपवतेंचा १६ मार्चला वाढदिवस होता.त्या दिवशी रुपवतेंना एक काॅल आला . दरम्यान यावेळी फोन वरून बोलताना संबंधित व्यक्तीने मी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बोलत आहे.असे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या फोन नंतर रुपवतेंनी तातडीने पोलिस स्टेशन गाठून या फोन बाबत तक्रार दाखल केली आहे.दरम्यान या शुभेच्छांचा फोन बाबत बोलताना विलास रुपवतेंनी म्हटले आहे की.हा विरोधकांनी बदनामीचा कट केला आहे.दरम्यान शुभेच्छाचा फोन स्वतः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांनेच केला आहे का? व कोणी चेष्टा केली आता याचा शोध आता मुंबई पोलिस घेत आहेत.