पिंपरी -चिंचवड दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चाकण येथे खूनातील आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगारांवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी दिनांक १८ मार्च रोजी रात्री 🌃 साडेदहा वाजण्याच्या सुमारास रामसे येथील मराठा हाॅटेल या ठिकाणी घडली आहे.या प्रकरणी गोळीबारात जखमी झालेल्या स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे ( रा.रासे चाकण पुणे) यांने चाकण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
दरम्यान या गोळीबाराप्रकरणी चाकण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी राहुल पवार ( रा.म्हाळुंगे रा.खेड जि.पुणे अजय गायकवाड ( रा.म्हाळुंगे खेड जिल्हा पुणे) व व इतर दोन युवकावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान मागील चार महिन्यांपूर्वी यातील आरोपी राहूल पवार यांचा भाऊ रितेश पवार यांचा खून झाला होता.यातील खूनातील आरोपी यांना सोप्या शिंदे यांने मदत केल्या बद्दल माहिती या आरोपींना मिळाली याच रागातून त्यांनी सोप्या शिंदे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या या गोळीबारात सोप्या हा जखमी झाला आहे.त्यांने चाकण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे.व अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आले आहेत.या प्ररकणी पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.