पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हवामान खात्याने अंदाज वर्तविण्यात येत असल्याने आजपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस विदर्भ व खानदेशात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच विदर्भात ४० किमी वेगाने वारे वाहतील तसेच काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.यातच काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे.पारा ४० घ्या पुढे गेला आहे.याचा प्रभाव विदर्भ व खान्देशात दिसून येत आहे.
दरम्यान मागील दोन दिवसांपासून विदर्भ व मराठवाडा येथील जिल्ह्यात सरी कोसळत आहे.हवामान खात्याच्या वतीने आज मंगळवारी व बुधवारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात अमरावती.भंडारा.गोंदिया.नागपूर.यवतमाळ.जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच हवामान खात्याने जम्मू काश्मीर तसेच लडाख. गिलगिट -बाल्टिस्तान.मुझफ्फराबाद.हिमाचल प्रदेश.व उत्तराखंड या भागात बर्फवृष्टी तर तसेच झारखंड.ओडिसा.छत्तिसगड.व बिहार या भागात पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.