Home राजकीय काॅग्रेस पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १८ जागांवर लढण्यांवर शिक्कामोर्तब

  काॅग्रेस पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १८ जागांवर लढण्यांवर शिक्कामोर्तब

  134
  0

  पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्ली येथे आज झालेल्या काॅग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकूण १८ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.तर उर्वरीत ३० जागांवर शिवसेना उध्वव ठाकरे गट व शरद पवार यांचा गट लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची माहिती विश्र्वनिय सूत्रांन कडून मिळत आहे.यात दोन महिला उमेदवारांचा समावेश असणार आहे.

  दरम्यान आज दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी दिल्लीत दाखल झाले आहेत . यामध्ये प्रदेश‌अध्यक्ष नाना पटोले.तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार.जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात.काॅग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा समावेश आहे.काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे.व सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सदरच्या बैठकीत महाराष्ट्रात एकूण लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.तर उर्वरित ३० जागांवर उध्वव ठाकरे व शरद पवार गट निवडणूक लढविणार आहे.यात दोन महिला उमेदवारांचा समावेश असून सोलापूर येथून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर येथून प्रतिभा धानोरकर यांचा समावेश आहे.

  Previous articleनिवडणूक आयोगाने ७२ लाख रुपये केले जप्त
  Next articleपुण्यातून आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी काॅग्रेसची उमेदवारी जाहीर

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here