Home कृषी चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले विदर्भात गारपीटीची शक्यता

    चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले विदर्भात गारपीटीची शक्यता

    105
    0

    पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) चंद्रपूर जिल्ह्याला भर उन्हाळ्यात गारपीटीसह अवकाळी पाऊसाने चांगलेच झोडपले आहे.दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्याने रस्त्यावर व घरावर व शेतात गारांचा मोठ्या प्रमाणावर खर्च पडला होता.तसेच रस्त्यावरुन नदी नाल्यातून व शेतातून पाणी वाहत होते.दरम्यान या अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी अलेले पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यात काढणी साठी आलेल्या मक्का.गहू ज्वारी मिर्ची सह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच वादळामुळे झाडे कोसळून पडले तर काही शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाली आहे.

    दरम्यान आज पून्हा अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.आज विदर्भातील भंडारा.गोंदिया.नागपूर वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.तसेच या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळी पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान मुंबई व पुण्यातील तापमानात काही प्रमाणावर किंचित घट निर्माण होऊन रात्रीच्या वेळेस थंडी पडण्याची शक्यता आहे.असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

    Previous articleजिंतूर येथे एसटी बस ५० फुट नदीत कोसळून भीषण अपघात
    Next articleबुलढाण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here