पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर -सोलापूर एसटी बसला भीषण असा अपघात झाला आहे.एसटी बस ही पुलावरून ५० फूट नदी पात्रात कोसळून झालेल्या अपघातात बसमधील एकूण १५ ते २० प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिक पोलिस यांनी तातडीने खासगी वाहनांनी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदरच्या अपघाता बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बस परभणी जिल्ह्यातून जात असताना जिंतूर येथील एका पूलावर बस चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस ५० फूट खोल नदी पात्रात कोसळून हा अपघात झाला आहे