Home क्राईम दौंड येथील कुरकुंभ एमआयडीसीमधून 1हजार 600किलो ड्रग्ज दिल्लीत

    दौंड येथील कुरकुंभ एमआयडीसीमधून 1हजार 600किलो ड्रग्ज दिल्लीत

    260
    0

    पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये पुणे शहर पोलिसांनी छापा मारून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करुन मोठे ड्रग्सचे रॅकेट उघडकीस आणले होते.व ड्रग्स जप्त करुन ड्रग्सचा कारखाना चालविरा व डिलेव्हरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या व हा ड्रग्सचा कारखाना सिल केला होता.दरम्यान पुणे शहर पोलिसांनी येथे छापेमारी केल्या नंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती.व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी दौंड येथील पोलिस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली पुणे ग्रामीण मुख्यालयात केली होती

    दरम्यान पुणे शहर पोलिसांनी यात अटक केलेल्या आरोपी पैकी हैदर शेख  यांने कुरकुंभ एमआयडीसी मधील ड्रग कंपनी मधून एकूण दोन ट्रीप मध्ये १ हजार ६०० किलो ड्रग्स हे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत पिक‌अप टेम्पो मधून पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तसेच या कालावधीत त्यांने पुणे ते दिल्ली असा प्रवास दोनदा विमानाने केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.अशी कबुलीच हैदरचा साथीदार मोहम्मद कुतुब कुरेशी यांने कोर्टात कबुली दिली आहे.दौंड एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर केमीकल कंपन्या आहेत.या पूर्वी देखील अशीच कारवाई दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणावर सापडले होते.व कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती.

    Previous articleपूर्ववैमनस्यातून चाकण येथे सराईत गुन्हेगारांवर गोळीबार
    Next articleभिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग 🔥 अनेक वाहने जळून आगीत खाक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here