Home राजकीय पुण्यातून आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी काॅग्रेसची उमेदवारी जाहीर

  पुण्यातून आमदार रविंद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी काॅग्रेसची उमेदवारी जाहीर

  208
  0

  पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभे साठी काॅग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुणे येथून कसबा विधानसभेचे काॅग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर  सोलापूर लोकसभा उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर येथून प्रतिभा धानोरकर गडचिरोलीतून नामदेव किरसंड अमरावती येथून बळवंत वानखेडे.कोल्हापूर येथून शाहू छत्रपती.नंदूरबार येथून गोपाळ पडवी.तर नागपूर येथून विकास ठाकरे.अशा महाराष्ट्रातील एकूण सात नावावर आज दिल्ली येथे शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली आहे.

  दरम्यान आता पुण्यातून लोकसभेसाठी काॅग्रेस पक्षाच्या वतीने रविंद्र धंगेकर यांचे नाव आज फायनल झाले आहे.त्यामुळे पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.दरम्यान पोटनिवडणुकीत भाजपच्या ताब्यात असलेला कसबा मतदार संघ रविंद्र धंगेकर यांनी काॅग्रेसकडे खेचून आणला होता.सर्व सामान्यांचा कार्यकर्ता म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख आहे.

  Previous articleकाॅग्रेस पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण १८ जागांवर लढण्यांवर शिक्कामोर्तब
  Next articleपरभणी.हिंगोली.नांदेडमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here