Home क्राईम बुलढाण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

  बुलढाण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

  119
  0

  पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जुन्या मुंबई ते पुणे महामार्गावर खोपोली येथे बुलढाण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण असा अपघात झाला आहे.बस वरील चालकांचे नियंत्रण अचानकपणे सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात बसचा क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर या अपघातात एकूण ४९ शालेय विद्यार्थी व शिक्षक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या सर्व जखमी विद्यार्थी व शिक्षक यांना तातडीने गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आले आहे.सदरची बस ही शालेय विद्यार्थी यांना बुलढाण्यातील चिखली येथून सहली साठी रायगडला घेऊन जात असताना या खासगी बसला खोपोली येथे अपघात झाला आहे.

  Previous articleचंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले विदर्भात गारपीटीची शक्यता
  Next articleनिवडणूक आयोगाने ७२ लाख रुपये केले जप्त

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here