पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भिवंडी येथील अंजुरफाटा ते दापोडा रोडवर असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी दिनांक १९ मार्च रोजी रात्री मध्यरात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण गोदाम हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.दरम्यान या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमाने ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.दरम्यान या गोदामाला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
दरम्यान भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत या भागात सर्वत्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर दिसत होते.या आगीत एक कंटेनर एक छोटा टेम्पो आणखी दोन दुचाकी व भंगाराच्या गोदामातील भंगार जळून खाक झाले आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान ही आग नियंत्रणात आणली आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.दरम्यान ही आग लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी रोडवरील वाहतूक व्यवस्था बंद ठेवली होती.