पुणे दिनांक २१ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज रात्रीच्या सुमारास ईडीने अटक केल्यानंतर यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना लक्ष करण्या करिता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.याचा त्रीव्र निषेध.यातूनच भाजप सत्तेसाठी किती खालची पातळी गाठू शकते हे आता दिसते.या असंवैधानिक कारवाई विरोधात ‘ भारत ‘ एकजुटीने उभा आहे.’ अशी टीका x वर पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.दरम्यान केजरीवाल यांच्या अटके नंतर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी भाजप सरकारच्या आदेशाने ईडीने ही कारवाई केली आहे अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.दरम्यान ‘ ही अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे.आम्ही संवैधानिक लोकशाहीसाठी एकजुटीने लढत राहू’ अशी यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.