Home क्राईम दौंड येथे पैलवानांच्या पिक‌अपला भीषण अपघात

  दौंड येथे पैलवानांच्या पिक‌अपला भीषण अपघात

  63
  0

  पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कुस्ती खेळण्या साठी निघालेल्या पैलवानांच्या पिक‌अप वाहनांना भीषण असा अपघात झाला असून या अपघातात १० ते १२ पैलवान गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दौंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी पिक‌अप जीपमधून पैलवान हे पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कुस्ती खेळण्या साठी जात असताना भरघाव वेगाने जाणाऱ्या पिक‌अप जीप वरील चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने जीप ही रोडवरील डिव्हायरला प्रथम धडकली व नंतर एका वीजेच्या खांबाला जोरात धडकली यात एकूण १२ पैलवान हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.स्थानिक नागरिकांनी त्यांना अपघातग्रस्त वाहनांतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.सदर अपघाताचा थरार हा सी सी टिव्ही कॅमे-यात चित्रीत झाला आहे.

  Previous articleआनंदाचा शिधा अडकला लोकसभेच्या आचारसंहितात
  Next articleसुप्रीम कोर्टाने झाल्यानंतर एसबीआय आली जागेवर इल्केशन कमीशनरकडे दिली म्हत्वाची माहिती.आता होणार पोलखोल

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here