Home क्राईम पालघरमध्ये प्राॅपर्टीच्या वादातून प्रेयसीची हत्या करुन मृतदेह वैतरणा नदीत फेकला घटने नंतर...

    पालघरमध्ये प्राॅपर्टीच्या वादातून प्रेयसीची हत्या करुन मृतदेह वैतरणा नदीत फेकला घटने नंतर एकच खळबळ

    171
    0

    पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पालघर मध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली असून चक्क प्राॅपर्टीसाठी प्रियकारांने प्रेयसीची हत्या केली आहे.त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली.सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसी ही नेहमीच लग्न करुन प्राॅपर्टी माझ्या नावावर कर म्हणून प्रियकरला म्हणत असल्याने चिडलेल्या प्रियकारांने संतप्त होऊन प्रेयसीची हत्या करून तिचा गळा कापून तिचा मृतदेह हा वैतरणा नदी पात्रात फेकला या प्रकरणी पोलिसांनी प्रियकार व त्याला मदत करणारा अशा दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान या हत्याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील सुनील यादव याचे एका महिले सोबत प्रेमप्रकरण सुरू होते.सदरची महिला ही नेहमी सुनीलला माझ्या सोबत लग्न कर व तुझी अर्धी प्राॅपर्टी माझ्या नावावर कर असे म्हणत होती.या मुळे सुनील हा संतप्त झाला व प्रियेसिला संपविण्याचा निर्णय घेतला.व आपल्या मित्राची मदत घेऊन योजना आखली.व तो प्रियेसिला म्हणाला आपण लोणावळा येथे जाऊ असे सांगून तिला गाडीत बसवून घटनास्थळी आणले.व प्रियेसीची निर्घृण हत्या केली.व मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडकं शरीरापासून वेगळे केले.व तो मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता.दरम्यान सदरच्या महिलेचा मृतदेह हा सापडल्या नंतर पालघरच्या पोलिस स्टेशन मध्ये आय पी सी कलम ३०२.व २०१ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला.व तपासा अंती हा सर्व प्रकार उघडकीस आला.दरम्यान प्रेयसीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर सुनील यादव व त्याचा मित्र महेश बडगुजर या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या बाबतचा पुढील तपास पालघर पोलिस करीत आहेत.

    Previous articleबांधकाम सुरू असतानाच इमारत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू अनेकजण जखमी
    Next articleआनंदाचा शिधा अडकला लोकसभेच्या आचारसंहितात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here