Home राजकीय पुणेकरांच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील ‘ -पंकाजा मुंडे

  पुणेकरांच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील ‘ -पंकाजा मुंडे

  30
  0

  पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे भाजप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चा मधील सहकारी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यात जवळचे सहकारी म्हणून मी त्यांच्या भेटी साठी आली आहे.मोहोळ हे प्रचंड मतांनी विजयी होतील व दिल्लीला जातील.असा विश्र्वास भाजपा नेत्या पंकाजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.’पुणेकरांच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील ‘ असेही यावेळी त्या म्हणाल्या आहेत.

  दरम्यान आज पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कर्वे रोडवरील २४ तास खुल्या संपर्क कार्यालयाला मुंडे यांनी भेट दिली.त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की.मुरलीधर मोहोळ हे माझे माझे छोटे बंधू असून त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज पुण्यात आली आहे.त्यांना मोठा विजय प्राप्त होवो.असे देखील मुंडे यावेळी म्हणाल्या.

  Previous articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
  Next articleशिवसेनेच्या वतीने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here