पुणे दिनांक २१ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना ( उध्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्वव ठाकरे यांनी मिरज येथील जनसंवाद सभेत भाजप व एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी सांगलीतून शिवसेना ( उध्वव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित केलं .
दरम्यान नाव घोषित करताना उध्वव ठाकरे म्हणाले की.मी माणूस बघून जबाबदारी देतो.माझी खात्री आहे की.जो माणूस मातीत कुस्ती खेळून जिंकतो.तो मातीशी इमानच राखेल.मातीशी कधीच बेईमानी करणार नाही.आज मी चंद्रहारची उमेदवारी जाहीर करतोय . शिवसेनेच्या मशाली चिन्हावर चंद्रहार तिथे निवडून जाणार आहे.हा मर्द तुमच्यासाठी उतरला आहे.पण याला जिंकवून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल . सांगलीकरांना सांगावां लागेल की आम्हीही मर्द आहोत.या चंद्रहारची गदा तुम्ही आहात.चंद्रहार तुझी अस्सल गदा समोर आहे.ती जोवर तुझ्या सोबत आहे.तोवर कशाचीही चिंता करु नको.असे उध्वव ठाकरे यावेळी म्हणाले.