पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कथीत मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली.यानंतर आज केजरीवाल यांना कोर्टापुढे हजर केले जाईल.तसेच याप्रकरणात ईडी आज केजरीवाल यांची चौकशी करणार आहे.या कथीत मद्य प्रकरणात केजरीवाल यांना ईडीने एकूण ९ समन्स बजावण्यात आले होते.पण या बाबत कोणतेच उत्तर न आल्याने ईडीने काल गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी धडक मारत त्यांना अटक केली आहे.दरम्यान आम आदमी पक्षाच्या वतीने काल रात्रीच केजरीवाल यांचे वकिल यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टरच्या घरी पोहोचून तातडीने या बाबत सुनावणीची मागणी केली होती.