Home क्राईम तडीपार गुंडाला अटक करुन गावठी पिस्तूल जप्त सिंहगड पोलिसांची कारवाई

    तडीपार गुंडाला अटक करुन गावठी पिस्तूल जप्त सिंहगड पोलिसांची कारवाई

    132
    0

    पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिंहगड रोड पोलिस हे पेट्रोलिंग करत असताना न-हे येथील जे.एस.पी.एम.काॅलेज येथे एक व्यक्ती संशयास्पद रित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचा युवक हा पोलिसांना पाहून त्या ठिकाणाहून पळून जाताना त्यांचा पाठलाग करुन मुसक्या आवळल्या व त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदेश उर्फ ऋषिकेश राम टेमकर (वय २१ रा.सुसगाव टेमकर वस्ती ता.मुळशी जि.पुणे ) असे आहे.हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याच्यावर हिंजवडी व पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून एक वर्षांकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली होती.दरम्यान सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या आदेशावरून सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस कर्मचारी हे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना सदरचा आरोपी हा न-हे येथील जे.एस.पी.एम.काॅलेज जवळ संशयित रित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस सदर ठिकाणी गेले असता पोलिसांची नजर चुकवून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांने पॅन्टच्या मागे गावठी पिस्तूल खोचले होते.पोलिसांनी त्याच्या कडून एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई ही पोलिस उपायुक्त परिमंडळ ३ . पुणे शहर संभाजी कदम.सहा.पोलिस आयुक्त कोथरूड विभाग ( अतिरिक्त पदभार) सिंहगड रोड पुणे भिमराव टिळे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार.पोलिस निरिक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर.यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक सचिन निकम.पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलिस अंमलदार आबा उत्तेकर.संजय शिंदे.तानाजी तारु.राजु वेगरे.विकास बांदल.अमोल पाटील.विकास पांडोळे.देवा चव्हाण.शिवाजी क्षीरसागर.राहुल ओलेकर.सागर शेंडगे.स्वप्नील मगर. विनायक मोहिते.यांच्या पथकाने केली आहे.

    Previous articleमुंबई ते बंगळुरू महामार्गवर भरघाव मोटार उलटून काॅलेजच्या युवकाचा मृत्यू
    Next articleनागपूर येथील बुटेबोरी एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट सहा कामगार जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here