Home क्राईम पोलिस दारात येताच ड्रग्स माफियाचा हृदयविकाराने मृत्यू

  पोलिस दारात येताच ड्रग्स माफियाचा हृदयविकाराने मृत्यू

  95
  0

  पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पोलिसांनी एका ड्रग्स माफियांच्या घरी ड्रग्स असल्याच्या माहिती वरुन समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला.पोलिसांना पाहून त्याला हृदयविकाराचा झटका आला.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.संबधित ड्रग्स फेडरर हा रेकॉर्ड वरील आहे.तो ५२ वर्षांचा असून या पूर्वी ड्रग्स विक्री संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो त्यांच्या नाना पेठ येथील घरी असल्याची माहिती मिळाली होती .सदर माहितीच्या आधारे पोलिस त्याच्या घरी गेले होते.पण दारात पोलिस पथक दिसताच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो दारातच कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.

  दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका येताच पोलिस व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता तेथे काही ग्रॅम ड्रग्स सापडले.दरम्यान या घटनेची समर्थ पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.

  Previous articleईडी आज केजरीवाल यांना कोर्टापुढे हजर करणार
  Next articleवर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here