पुणे दिनांक २३मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी २२ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास प्रकरणी या तक्रारीत आरोप करण्यात आले आहे.दरम्यान अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह वापरताना त्याखाली सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.पण या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.