Home क्राईम छत्तीसगड येथील दंतेवाडामध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी

    छत्तीसगड येथील दंतेवाडामध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार तर दोन जवान जखमी

    172
    0

    पुणे दिनांक २३ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.तर शेजारच्या सुकमा जिल्ह्यात आयडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गंगलूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील जंगलात वेगवेगळ्या सुरक्षादलाचे जवान नक्षल विरोधी मोहिमेसाठी जात असताना ही चकमक झाली.

    दरम्यान मावोद्यांचा गड समाजल्या जाणाऱ्या विजापूर दंतेवाडा व सुकामा जिल्ह्याच्या ट्राय जंक्शन येथे ही कारवाई करण्यात आली.राज्चो जिल्हा राखीव रक्षक ( डीआरजी) बस्तर फायटर्स.केंद्रीय राखीव पोलीस दल व त्यांची एलिट युनिट कोब्रा आणि तीन जिल्ह्यांतील स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी या कारवाईत भाग घेतला.शुक्रवारी संध्याकाळी ही मोहीम सुरू करण्यात आली होती.राजधानी रायपूर पासून ४५० किलो मीटर अंतरावर असलेल्या पिडिया गावाजवळील जंगलात सुरक्षा दलांनी वेढा घातला असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला.त्यावेळी दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला.दरम्यान गोळीबार थांबल्यावर घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.या परिसरातून अजून अन्य नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरक्षा रक्षकांडून सुरू आहे.दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या वेळी दंतेवाडा -सुकमा सीमेवर नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या हल्ल्यात बस्तर फायटरचे दोन जवान जखमी झाले अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या दोन जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

    Previous articleदेवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून १५ लाखांची फसवणूक करणारे दोघेजण गजाआड
    Next articleअकोल्यात भर रस्त्यात अचानकपणे कारने घेतला पेट जिवीतहानी नाही

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here