पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून तब्बल १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या बाबतची घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान या बाबत पोलिसांनी दोन भामट्यांना गजाआड केले आहे.मात्र या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपण पी.ए. आहे.असे सांगून दोन भामट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान सोसायटीचे काम करुन देतो असे सांगून आरोपी यांनी ही फसवणूक केली आहे .या बाबत पोलिसांनी १) सुहास महाडिक २) किरण पाटील या दोघांना गजाआड केले आहे.या फसवणूक प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये १७०.४१९.४२०. ३४ नुसार गुन्हा दाखल असून या प्रकरणी पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करत आहेत.