Home फायर उज्जैनच्या मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात 🔥 आग आगीत पुजा-यांसह १३ जण...

उज्जैनच्या मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात 🔥 आग आगीत पुजा-यांसह १३ जण होरपळले

105
0

पुणे दिनांक २५ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मध्य प्रदेश येथील प्रसिद्ध उज्जैन येथील महाकाल मंदिरात गर्भगृहात आज सोमवारी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अचानकपणे आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.दरम्यान या आगीत एकूण पुजारीसह १३ जण होरपळले आहे आरतीच्या वेळी गुलाल टाकल्यानंतर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान मंदिरात लागलेली आग आटोक्यात आणली असून यात होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीच्या घटनेनंतर मंदिरात उपस्थित असलेले भावीक हे प्रचंड प्रमाणावर घाबरले व मंदिरात एकच गोंधळ उडाला.दरम्यान या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे.तसेच उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला आहे.सदरची आग ही किरकोळ स्वरूपाची होती.यात कोणीही गंभीर रित्या जखमी झाले नाही. व सदरची आग आटोक्यात आणली आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.

Previous articleदिल्लीतील गोदामाला भीषण आग 🔥 अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू
Next articleधारशिवमध्ये दोन गटात तुफान दगडफेक पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here