पुणे दिनांक २५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भारताची राजधानी येथील नवी दिल्लीत होळीच्या निमित्ताने नरेला येथील बुधपूर परिसरात आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास एका गोदामाला अचानकपणे भीषण आग लागली आहे .आग लागताच काही कळण्याच्या आत सदर आगीने भीषण असे उग्र रूप धारण केले.व ही आग आजूबाजूच्या गोदामाला आग लागली व या आगीच्या भीषण अशा ज्वालांनी इतर गोदाम देखील भक्ष्यस्थानी घेतले आहे.ददरम्यान सर्वत्र आगीच्या मोठ्याप्रमाणावर ज्वाळा दिसत आहे.व सर्वत्र धूरांचे लोट दिसत आहे.या भागातील रहिवासी यांच्यात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या आगीची माहिती ही नवी दिल्ली च्या महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिल्यानंतर एकूण ३४ अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.व ते या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.