पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार धाराशिव येथे दोन गटात सोमवारी रात्रीच्या वेळी तुफान असा राडा झाला आहे.या दोन्ही गटातील लोकांनी यावेळी तुफान अशी दगडफेक केली.त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.दरम्यान या दगडफेकीच्या वेळी दोन्ही गटांतील लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्र्रूधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या दरम्यान पोलिसांनी 👮 या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.दरम्यान यावेळी पोलिसांनी एकूण दोन्ही गटाच्या १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.व तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान या दोन्ही गटात तणाव कसा निर्माण झाला.व दगडफेकीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.